Bhishma School
of Sanskar
कथा संस्कार
रामायण, महाभारत, वेद, उपनिषदे, पुराणे, हितोपदेश, पंचतंत्र यातील निवडक गोष्टी
कालावधी - सोमवार ते शुक्रवार
वेळ - ९ ते ९.३०
दैनंदिन ३० ते ४५ मिनिटे
कथा आणि गोष्टी यांचे बालमनाला विलक्षण आकर्षक असते. विशेषत: शाळेत जायला लागल्यापासून मुलांचे भावविश्व विस्तारत जाते. सुरुवातीला राजकन्या, राजपुत्र, अप्सरा, परी, राक्षस यांच्या गोष्टी मुलांना आवडतात. त्यानंतर रामायण, महाभारत, पुराण, कथा कल्पतरू, पंचतंत्र इत्यादी गोष्टींची आकर्षण वाटते. यातून त्यांच्या बुद्धीचा आणि मनाचा विकास होतो. विचार करण्याची शक्ती वाढते. पंचमहाभूतांची ओळख होते. पंचकोषांचा विकास व्हायला मदत होते. गोष्टी, कहाण्या, कथांमधील विविध घटना आणि प्रसंग यामुळे त्यांच्या मनावर सुप्त संस्कार होतात. त्यातून त्यांचे व्यक्तीत्व आणि चारित्र्य घडत जाते. त्यांच्या बाल मनाला अनेक प्रश्न पडतात. त्याची त्यांना उत्तरेही मिळतात. एक प्रकारचा आगळावेगळा आनंद मिळतो.
पूर्वीच्या काळी एकत्रित कुटुंब पद्धतीमध्ये आजी, आजोबा, काका, काकू, मामा, मामी, शेजारी पाजारी इत्यादी कुटुंबातील आणि समाजातील अनेक घटक मुलांबरोबर गप्पा मारायचे, खेळायचे, त्यांना गोष्टी सांगायचे. त्यांच्या प्रश्नांची उत्तरे द्यायचे. याचबरोबर चांदोबा, आनंद, मुलांचे मासिक, अमृत इत्यादी अनेक मासिके मुलांच्या गोष्टींची भूक भागवायचे. यामध्ये सार्वजनिक वाचनालयांचाही मोठा वाटा होता. या गोष्टी, कथा, कहाण्या, यांचा उद्देश फक्त करमणूक करणे, टाइमपास करणे असा नव्हता. त्यातून मुलांच्या बौद्धिक, मानसिक विकासासाठी अप्रत्यक्षरीत्या मोठा हातभार लागला जात होता. त्यांची कल्पनाशक्ती, स्मरणशक्ती यांचा विकास होत असे.
आजच्या गतिमान जीवनात संस्कार कसे करायचे ही एक मोठी समस्या होऊन बसली आहे. आई-वडील, कुटुंबातील बहुतेक सदस्य हे सतत व्यस्त आणि कार्यरत असल्याने मुलांसाठी वेळ काढणे, त्यांच्याशी गप्पा मारणे, त्यांच्या प्रश्नांना उत्तर देणे हे फार अवघड झाले आहे. मुलांना गोष्टी सांगणे, कथा - कहाणी सांगणे हे तर अशक्य होत चालले आहे. शिवाय स्वतंत्र कुटुंब पद्धतीमुळे आजी, आजोबा, काका, काकी इत्यादी नातेवाईक मुलांच्या वाट्याला येणे हेही दूरावत चालले आहे. मुलांना गोष्टी सांगायच्या आहेत, त्यांच्याबरोबर गप्पा तर मारायच्या आहेत, त्यांच्यावर संस्कार करायचे आहेत, या सर्व गोष्टी करायची इच्छा तर खूप आहे परंतु वेळ मिळत नाही, ही समस्या आहे. याच बरोबर आई-वडिलांनाही अनेकदा रामायण, महाभारत, पंचतंत्र या ग्रंथांची फारशी ओळख नसते, हीही समस्या आहे. याचबरोबर आपल्या मुलांसाठी आपण सर्व काही करीत आहोत. परंतु आपल्या मुलांनीच भविष्यात आपल्याला नीट वागवले नाही तर काय करायचे अशी सूक्ष्म भीती कुठेतरी खोलवर अंत:र्मनामध्ये असते.
भीष्म स्कूल ऑफ संस्कार यांनी कथा संस्कार हा उपक्रम उपक्रम सुरू केला आहे. रोज रात्री ऑनलाईन माध्यमातून मुलांना गोष्टी सांगणे असे या उपक्रमाचे स्वरूप आहे. यामध्ये सुरुवातीला एक श्लोक, त्यानंतर गोष्ट आणि शेवटी प्रार्थना असे या उपक्रमाचे स्वरूप आहे. रोज रात्री झोपायच्या अधी गोष्ट ऐकून मग झोपी जायचे अशी कल्पना आहे. अर्थात मुलांबरोबरच पालक आणि घरातील इतर सर्व सदस्य या गोष्टी ऐकू शकतील, रामायण, महाभारत, वेद, उपनिषदे, पुराणे, हितोपदेश, पंचतंत्र इत्यादी ग्रंथातून या गोष्टी निवडल्या जाणार आहेत. अत्यंत सोप्या आणि रंजक शैलीमध्ये या गोष्टी सांगितल्या जाणार आहेत. मराठी आणि हिंदी भाषेमध्ये या गोष्टी सांगितल्या जातील. गोष्टी कशा प्रकारे सांगितल्या जातील त्याची नमुना गोष्ट आपल्या येथे क्लिक करून ऐकता येईल.
कथा संस्कार साठी नोंदणी करा
मासिक सदस्यता
रुपये ३०० /-
सोमवार ते शुक्रवार दैनंदिन रात्री ९ ते ९.४५
महिन्यात पुराण व वेदांमधील लाईव्ह कथा
वार्षिक सदस्यता
रुपये ३०००/-
सोमवार ते शुक्रवार दैनंदिन रात्री ९ ते ९.४५
वर्षभर पुराण व वेदांमधील लाईव्ह कथा