Bhishma School
of Sanskar
भीष्म विषयी
ऑनलाइन संस्कार शाळा
भीष्म स्कूल ऑफ संस्कार ही भीष्म फाउंडेशन फॉर भारतीय नॉलेज सिस्टीम यांच्या सहयोगाने कार्य करणारी संस्था आहे. भीष्म स्कूल ऑफ इंडिक स्टडीज द्वारा भारतीय ज्ञान परंपरेवर आधारित प्रमाणपत्र, पदविका, पदवी, मास्टर्स, आणि डॉक्टरेट स्तरावर ऑनलाईन अभ्यासक्रम राबवत आहे. भीष्म स्कूल ऑफ संस्कार हे वि:शेषता ७ ते १४ या वयोगटातील मुलांसाठी उपक्रम राबवत आहे. अर्थात या उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी वयाची कोणतीही अट नाही. भीष्म स्कूल ऑफ संस्कार यांनी पुढील उपक्रमांद्वारे आपल्या कार्याची सुरुवात केली आहे.
-
कथा संस्कार अर्थात स्टोरी टेलिंग द्वारे संस्कार
-
अत्यंत शूर आणि पराक्रमी अशा भारतीय राजांचा परिचय करून देणारी ऑनलाईन कार्यशाळांची मालिका प्रत्येक आठवड्याला एका राजाची सर्वांगीण माहिती आणि परिचय.
-
विश्व संस्कारविद्या परिषद - प्राचीन भारतीय संस्कारांचे भारतीय संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. त्यासाठी कार्यरत असणाऱ्या आणि कार्य करू इच्छीणाऱ्या सर्वांची एक शिखर संस्था मधून विश्व संस्कारविद्या परिषदेची स्थापना भीष्म फाउंडेशन द्वारे केली आहे.
सहभागी व्हा