top of page

स्तोत्र पठण संस्कार

            भारतीय संस्कृती आणि परंपरांमध्ये स्तोत्र पठणाचे फार महत्त्व आहे. विशेषतः लहान वयामध्ये स्तोत्रे पाठ करण्याचा आग्रह केला जात असे. मुलांना पहाटे लवकर ब्राह्ममुहूर्तावर उठवून, त्यांच्याकडून श्लोक, ओव्या, स्तोत्र, मंत्र पाठ करवून घेण्याची पूर्वापार पद्धत होती. लहान वयातच मेंदूचा विकास होतो. मुलांचे व्यक्तिमत्त्व तयार होते. आधुनिक विज्ञानानेही आता स्तोत्र-मंत्रामागचे विज्ञान मान्य केले असून त्याचा आरोग्यावर आणि मुलांच्या वाढीवर चांगला परिणाम होतो हे मान्य केले आहे. पूर्वीच्या काळात स्तोत्रांबरोबरच गणिताचे पाढे, पावकी, निमकी, दिडकी, अडीचकी असे गणितासंबंधी पाढे पाठ करून घेतले जात असत. स्तोत्र पठणामुळे मुलांचा आवाज खणखणीत होतो. गळ्याची आणि स्वरयंत्राची चांगली वाढ होते. उच्चार शुद्ध होतात. आत्मविश्वासामध्ये वाढ होते. मुले तेजस्वी होतात. फक्त मुलेच नव्हेत तर मोठ्या व्यक्तींमध्येसुद्धा स्तोत्रपठणाने विविध फायदे दिसून येतात. पंचकोशांचे संतुलन होते. स्तोत्र मंत्रांच्या पठणाने विविध नादमय स्पंदने तयार होतात. ही स्पंदने आपले हृदय, फुप्फुस आणि रक्ताभिसरण सुरळीत राहण्यासाठी सहाय्यक ठरतात. एका अर्थाने स्तोत्रपठण हे उपचारांचेही काम करते. ज्याप्रमाणे संगीत उपचार काम करतात त्याप्रमाणे स्तोत्रपठणही काम करते. विविध स्तोत्रे ही विविध देवतांसाठी तयार केली गेली आहेत. उदा. विष्णू सहस्रनाम विष्णू देवतेसाठी, सरस्वती वंदना सरस्वती देवीसाठी, अथर्वशीर्ष गणेश म्हणजे बुद्धीच्या देवतेसाठी, इ. श्रद्धेने विचारपूर्वक स्तोत्र पठण केल्यास अनेक आश्चर्यकारक अनुभव येतात असे अनेकांनी स्वअनुभवातून सांगितले आहे.

            स्तोत्रपठण ही भारतीय संस्कृतीतील परंपरा पुन्हा सुरु करण्यासाठी भीष्म स्कूल ऑफ संस्कार यांनी स्तोत्रपठण संस्कार हा उपक्रम सुरु केला आहे. आजच्या गतिमान जीवनामध्ये स्तोत्रपठणाची माहिती अनेकांना नसते. त्याचबरोबर एकत्रित कुटुंबपद्धतीचा ऱ्हास होऊन छोटी स्वतंत्र कुटुंबे ( न्युक्लिअर कुटुंबे ) तयार झाल्याने स्तोत्रपठणाची परंपरा लुप्त होत आहे. अनेकदा आई वडिलांनाच स्तोत्रे आणि त्यांच्या पठणाविषयी फारशी माहिती नसते. तसेच स्तोत्रे शिकवणारे, पाठांतर करून घेणारे आणि ते तपासणारे जवळपास उपलब्ध असत नाहीत. भीष्म स्कूल ऑफ संस्कार यांनी ऑनलाईन झूम अॅपच्या माध्यमातून स्तोत्र पठण संस्कार हा उपक्रम सुरु केला आहे. याद्वारे दरमहा दोन किंवा तीन स्तोत्रे पाठ करून घेतली जाणार आहेत. रोज सकाळी हे वर्ग चालतील. प्रत्येक महिन्यानुसार कोणती स्तोत्रे शिकवली जातील यांचे वेळापत्रक संकेतस्थळावर दिलेले आहे.

नियम व अटी :

  1. स्तोत्रपठण संस्कार वर्गासाठी ऑनलाईन नोंदणी करावी लागेल.

  2. वरीलपैकी कोणत्याही एका प्लॅननुसार या वर्गामध्ये सहभागी होता येईल.

  3. महिन्याच्या कोणत्याही तारखेला जॉईन होता येईल. त्या महिन्याच्या एक तारखेपासून कालावधी निर्धारित केला जाईल.

  4. कोणताही प्लॅन मध्येच सोडता येणार नाही.

  5. एकदा भरलेली रक्कम कोणत्याही कारणाने परत मिळणार नाही.

  6. नोंदणी केल्यावर ४८ तासांमध्ये आपल्याला झूम लिंक ईमेल आयडीवर पाठवली जाईल.

  7. दर महिन्याच्या एक तारखेला नवीन लिंक पाठवली जाईल.

  8. दर आठवड्याला सोमवार ते शुक्रवार या दिवशी वर्ग चालेल. सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी वर्गाला सुट्टी असेल.

  9. सर्व तक्रारी आणि दावे यासाठी पुणे महानगर न्यायालयीन क्षेत्र ही न्यायिक सीमा राहील.

bottom of page